महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असा प्रकार साताऱ्यात आलेला असून एका अकरा वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करत दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून दोन संशयित आरोपी हे अल्पवयीन आहेत. कराड जवळ हा प्रकार घडलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार ओम संजय डुबल ( वय 19 ) आणि प्रसाद महेश कुलकर्णी (वय 19 ) अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. पीडित मुलाच्या एका नातेवाईक महिलेने यासंदर्भात पोलिसात फिर्याद दिली आहे. 8 सप्टेंबरला संध्याकाळी चारच्या सुमारास परिसरातील एका मंडपाजवळ आरोपींनी अल्पवयीन मुलासोबत हा घृणास्पद प्रकार केला आहे.
प्रसाद कुलकर्णी आणि ओम डुबल याच्यासोबत दोन अल्पवयीन मुले तिथे आली आणि त्यांनी या अल्पवयीन मुलाला एका हॉलमध्ये घेऊन जात त्याला मोबाईलवर अश्लील चित्रफिती दाखवल्या आणि त्याचे लैंगिक शोषण केले. आरोपींनी याचा व्हिडिओ देखील काढलेला असून पोलिसांनी आरोपींचे मोबाईल ताब्यात घेत तपासाला सुरुवात केलेली आहे.