नगरमध्ये फेरफटका मारणाऱ्या महिलांच्या अंगावरील दागिने पळवण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असाच एक प्रकार शहरातील नवले नगर परिसरात समोर आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , मंदा मधुकर रोहकले ( वय 63 वर्ष राहणार बीएसएनएल ऑफिस सावेडी ) या त्यांच्या राहत्या घराजवळ शनिवारी 14 तारखेला संध्याकाळी पाचच्या दरम्यान फेरफटका मारत असताना पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील गंठण हिसकावले आणि तेथून पोबारा केला. चार तोळ्यांचे गंठण पळवल्या प्रकरणी तोफखाना पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे