भाजपच्या खासदार कंगना राणावत यांचा इमर्जन्सी चित्रपट वादात सापडलेला असून या चित्रपटात शीख बांधवांची प्रतिमा मलिन केल्याच्या आरोपावरून चंडीगड जिल्हा न्यायालयाने कंगना राणावत यांना नोटीस बजावली आहे.
कंगना राणावत आणि इतर प्रतिवादी यांनी 5 डिसेंबरपर्यंत यासंदर्भात आपली भूमिका मांडावी असे देखील निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत. एडवोकेट रवींद्र सिंग बस्सी यांनी कंगना राणावत यांच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे