लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ‘ भाग्यवान ‘ ला घेतलं ताब्यात , काय आहे प्रकरण ? 

शेअर करा

लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार नगर जिल्ह्यात समोर आलेला असून तक्रारदाराच्या भावावर आश्वी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तहसीलदारांसमोर हजर करण्याची कारवाई टाळण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती मात्र त्यातील नऊ हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी सहाय्यक फौजदाराला रंगेहाथ ताब्यात घेतलेले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , रवींद्र भानुदास भाग्यवान ( सहाय्यक फौजदार वय 52 राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी ) यांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

तक्रारदार व्यक्ती यांच्या चुलत भावावर आश्वी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता आणि तहसीलदारांसमोर हजर करण्याची प्रक्रिया सहाय्यक फौजदाराने करणे बंधनकारक होते मात्र दाखल गुन्ह्याची तडजोड करणे आणि हजर करण्याची कारवाई टाळणे यासाठी सहाय्यक फौजदाराने लाच मागितली आणि त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. लाचलुचपतचे पोलीस अंमलदार चंद्रकांत काळे , बाबासाहेब कराड , रवींद्र निमसे आणि चालक दशरथ लाड यांनी कारवाईत सहभाग घेतला. 


शेअर करा