
खासदार निलेश लंके यांचे जवळचे सहकारी ऍडव्होकेट राहुल झावरे यांच्यावर हल्ला प्रकरणातील आरोपी पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांचा जामीन अर्ज अखेर मंजूर करण्यात आलेला असून तब्बल २५ जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. विजय सदाशिव औटी यांचा जामीन अर्ज आज मंजूर करण्यात आला आहे .
पारनेरच्या आंबेडकर चौकात विजय सदाशिव औटी , नंदू सदाशिव औटी , प्रितेश पानमंद , अंकुश भागाजी ठुबे , निलेश घुमटकर , संगम सोनवणे यांच्यासोबत इतर दहा ते बारा व्यक्तींनी राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला केलेला होता त्यात राहुल झावरे गंभीर जखमी झाले होते.
राहुल झावरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पारनेर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत विजय औटी , नंदू औटी ,प्रितेश पानमंद आणि मंगेश कावरे यांना अटक केलेली होती. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न तसेच आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता .