महाराष्ट्रातील बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला असून सोमवारी संध्याकाळच्या सुमारास त्याला ट्रान्सिट रिमांडसाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला आहे. अक्षय शिंदे याला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना अक्षयने पोलिसाची बंदूक हिसकावून घेत त्याने पोलिसांवर गोळीबार केला.
आरोपी अक्षयने पोलिसांच्या हातून बंदूक हिसकावून घेतली अशी माहिती समोर येत आहे . पोलिसांच्या व्हॅनमधून ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना शेजारील पोलिसाची बंदूक हिसकावून घेत गोळीबार केला आणि प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला आहे. त्याचा मृतदेह कळवा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे तर जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेले आहे.
अक्षयने पोलिसांच्या बंदुकीने गोळीबार केला म्हणून स्वसंरक्षणासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. अक्षयच्या गोळीबारापासून वाचवण्यासाठी पोलीसांनीही गोळीबार केला त्यात त्याचा मृत्यू झाला. शाळेतील दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली त्याने नुकतीच पोलिसांकडे दिली होती.