नगर जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना नेवाश्यात समोर आलेली असून दोन्ही हातांना आणि गळ्याला दोरी बांधून एका शेतकऱ्याने ८० फूट विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे. 21 तारखेला सकाळी साडेनऊच्या सुमारास नेवासे तालुक्यातील पाचेगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , संतराम मतकर ( वय 45 वर्ष राहणार पाचेगाव ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप पर्यंत समोर आलेले नाही. दोन चिठ्ठ्या वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्या मात्र त्यातील मजकूर अद्यापपर्यंत पोलिसांनी स्पष्ट केलेला नसून दोन्ही चिठ्ठ्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.