नगर तालुक्यातील घोसपुरी इथे एक दुर्दैवी अशी घटना समोर

शेअर करा

नगर तालुक्यातील घोसपुरी इथे एक दुर्दैवी अशी घटना समोर आलेली असून एका 52 वर्ष शेतकऱ्याने गळफास घेऊन टोकाचे पाऊल उचलले त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , दत्तात्रय गोरख झरेकर ( वय 52 वर्ष राहणार घोसपुरी तालुका नगर ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून नगर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. 

झरेकर यांनी त्यांच्या शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या जावयाने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तोपूर्वीच त्याचा मृत्यू झालेला होता. झरेकर यांनी काही काळ बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेत देखील काम केलेले असून त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांवर शोककळा पसरलेली आहे. 


शेअर करा