विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेच्या विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या फौजदारी तक्रारीची सुनावणी ‘ एमपी एमएलए ‘ विशेष न्यायालयात होणार असून पुण्यातील प्रथमवर्ग दंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.
लोकप्रतिनिधींवरील दाखल असलेल्या फौजदारी स्वरूपाच्या प्रकरणांची सुनावणी जलद गतीने व्हावी यासाठी या न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली असून पुण्याचे जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी विशेष न्यायालयात या संदर्भात तक्रारीची सुनावणी घ्यावी असे आदेश जारी केलेले होते त्यानुसार आता 4 ऑक्टोबरला ही सुनावणी होणार आहे.