‘ अगं मी एकटाच आहे ‘ असे तो प्रेयसीला म्हणाला मात्र सेल्फीत चुकून दिसले असे काही की … ?

  • by

प्रेमात विश्वास हा खूपच महत्वाचा असतो. नात्यात विश्वास नसेल पार्टनरच्या संशयी प्रवृत्तीमुळे किंवा खोटं बोलण्याच्या सवयींमुळे अशा अनेक कारणांनी नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो किंवा नातं तुटू सुद्धा शकतं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल सांगणार आहोत यात प्रियकराने त्याच्या प्रेयसीला तो एकटा आहे असे सांगितले तर होते मात्र सेल्फी पाठवताच त्याचे बिंग बाहेर पडले.सोशल मीडियावर एका मुलीने आपल्या प्रियकराची पोलखोल केली आहे.

आपला पार्टनर आपल्याला धोका देऊ शकतो याची कल्पनासुद्धा या मुलीला नव्हती. फक्त एका सेल्फीमुळे या मुलाचे खोटं पकडलं गेलं आहे. या डिटेक्टटिव्ह मुलीने या प्रियकराचं पितळ कसं उघडं पाडलं याची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आजच्या मोबाईल फोनच्या जमान्यात लोक भेटण्यापेक्षा चॅटींग, मेसेज आणि व्हिडीओ कॉलवर आपल्या आवडच्या माणासांसोबत जास्त वेळ घालवतात. याच कारणामुळे आजच्या जमान्यात लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप टिकून राहतात.

सोशल मीडियावर एका २४ वर्षीय तरूणीने आपल्या पार्टनरचा खोटारडेपणा उघडकीस आणला आहे. या तरूणीचे नाव सिडनी किश्चन आहे. या घटनेनंतर सर्वच मुली जरा अलर्ट झाल्या आहेत.सिडनीचे रिलेशन खूपच चांगले चालत होते. पण एका सेल्फीमुळे सारं काही बदललं. सिडनी आपल्या प्रियकरासोबतच राहत होती. त्याने कामानिमित्त बाहेर जाण्याचा प्लॅन केला. पार्टनरवर विश्वास असल्यामुळे सिडनीने त्याला जास्त प्रश्न विचारले नाहीत. काहीवेळाने स्नॅपचॅटवर सिडनीला आपल्या प्रियकराचा फोटो मिळाला.

या फोटोमध्ये त्याने सनग्लासेस लावले असून हायवेवर प्रवास करत होता. सिडनी आधी हा फोटो पाहून खूश झाली. नंतर तिची नजर प्रियकराच्या चष्म्यावर गेली आणि झोपच उडाली. कारण चष्म्यात एका मुलीचे पाय सिडनीला दिसले. मुलीचे पाय पाहून सिडनीला धक्काच बसला. सिडनीने स्क्रिनशॉट काढला आणि नातेवाईकांना पाठवला. तब्बल ४ वर्षांपासून सिडनी रिलेशनशीपमध्ये होती.सिडनीने टिकटॉकवरही आपल्या प्रियकराची पोलखोल केली. आतापर्यंत १८ लाख लोकांनी हा फोटो पाहिला असून तीने मुलींना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलं आहे.