‘ अशोक लांडे खून प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आलेले संदीप , सचिन आणि अमोल कोतकर या तिघांच्या जामीन अर्जाला फिर्यादी शंकर राऊत यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलेले आहे. मेडिकल पॅरिटीवर त्यांना जामीन मंजूर करीत आलेला होता त्याबाबत देखील उच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटीशन दाखल आहे , अशी माहिती तक्रारदार शंकर राऊत यांनी देत 25 तारखेला या प्रकरणी सुनावणी आहे अशी माहिती पत्रकारांना दिलेली आहे.
शंकर राऊत म्हणाले की ,’ नगर जिल्ह्यात सचिन कोतकर आल्यानंतर त्याने एका हॉटेलमधील कामगार मारहाण केल्याचा गुन्हा कोतवाली पोलिसात यापूर्वीच दाखल आहे. कलम 351 तीन मध्ये सात वर्ष शिक्षेची तरतूद आहे मात्र तीन महिन्यात कोणताही तपास झालेला नाही. सचिन कोतकरचा जामीन रद्द करावा अशी आपली मागणी आहे. कोतकर कुटुंबीयांनी पुन्हा नगर शहरात गुन्हेगारी वाढवण्यासाठी डोके वर काढले आहे. नगर शहरातून त्यांची हकालपट्टी करावी यासंदर्भात जनहित याचिका हायकोर्टात दाखल करणार आहोत ,’ असे देखील त्यांनी सांगितले
नगर शहरात एकेकाळी कोतकर कुटुंबियांची जबरदस्त दहशत होती. अशोक लांडे खून प्रकरणात भानुदास कोतकर व त्याची तीन मुले या चारही जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. सचिन , संदीप आणि अमोल कोतकरला मेडिकल पॅरिटीवर मिळालेल्या जामीनास सर्वोच्च न्यायालयात आपण आव्हान देणार आहोत असे देखील राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.