शिक्षण देण्याऐवजी प्राथमिक शिक्षकांवर इतरच कामांसाठी सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून अचानकपणे जबाबदारी दिली जात असल्याने त्या विरोधात नगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा आक्रोश मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आलेला होता.
प्राथमिक शिक्षकांवर शिक्षण सोडून इतरच जबाबदाऱ्या टाकत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते त्यामुळे आगामी काळात शिक्षकांवर शिक्षण सोडून इतर जबाबदाऱ्या देऊ नयेत यासाठी या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते. नगर जिल्ह्यातील हजारो शिक्षक या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले होते.
सरकारच्या अनेक उपक्रमांसाठी गेल्या काही वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांवर अचानकपणे जबाबदारी टाकण्याचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होते उलट प्राथमिक शिक्षकांच्या देखील कौटुंबिक अडचणीत वाढ होते. गेल्या काही वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांचा सातत्याने याला विरोध राहिलेला असून सरकार दरबारी कुठलीही दखल घेतली जात असल्याकारणाने अखेर या आक्रोश मोर्चाचे आज नगरमध्ये आयोजन करण्यात आलेले होते. जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांमधील देखील अनेक प्राथमिक शिक्षक या मोर्चात सहभागी झालेले यावेळी पाहायला मिळाले.