अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात कुणाला वाचवण्याचा तर .., उत्कर्षाताई रुपवते म्हणाल्या की

शेअर करा

बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काऊंटर मध्ये झालेला मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप होत असून वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते यांनी देखील या प्रकरणी आपली भूमिका मांडलेली आहे. 

उत्कर्षाताई रुपवते म्हणाल्या की, ‘ बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला यामधून कोणाला वाचवण्याचा प्रयत्न आहे का ? ज्या शिक्षण संस्थेत ही घटना घडली त्यांचे संचालक पदाधिकाऱ्यांचे नावे प्रकरणात आहेत, त्यापैकी कोणालाही अटक झाली नाही. आरोपीचा बळी देऊन कुठेतरी या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न आहे का ?’ 

उत्कर्षाताई रुपवते पुढे म्हणाल्या की, ‘ शाळेतील सीसीटिव्ही फुटेज गायब आहेत ज्या कॉन्स्टेबलवरती गोळीबार झाला त्यांचा वैद्यकीय अहवाल समोर आला पाहिजे यामुळे ही झालेली चकमक ही चुकीच्या लोकांना संरक्षण देण्यासाठी आहे की नाही हे जनतेसमोर आले पाहिजे .’ 

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे यांनी देखील या प्रकरणी शंका उपस्थित केलेली असून आरोपी अक्षय शिंदे यांच्या दोन्ही हातात बेड्या असताना त्याने केलेल्या गोळीबारात पोलिसांच्या पायावर गोळी लागली मात्र प्रशिक्षित पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याच्या छातीत गोळी लागली याविषयी देखील शंका उत्पन्न केलेली आहे .


शेअर करा