नगर शहरातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा , नियोजनशून्य कामांमुळे नागरिकांना वाहने चालवणे झाले अवघड

शेअर करा

गेल्या तीन दिवसांपासून नगर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून दररोज पाऊस येत असल्याकारणाने शहरातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झालेली आहे.  शहरातील ठिकठिकाणी रस्त्यांमधील खड्ड्यात पाणी साठलेले असल्याकारणाने वाहन चालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. 

गेली पाच वर्ष कुठलीही मोठ्या स्वरूपाची रस्त्याची कामे नगरमध्ये झाली नाहीत मात्र ऐन पावसाळ्यात निधी आणून या कामांना सुरुवात करण्यात आलेली आहे. नियोजन शून्य पद्धतीने कामे सुरू असल्याकारणाने अनेक ठिकाणी वाहनांची कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे त्याचा व्यवसायांवर देखील विपरीत परिणाम होत आहे. 

दररोज हजारो नागरिक ये जा करत असलेले रस्ते वन वे बनवण्यात आलेले आहेत त्यात  माती साठलेली असल्याने घसरून अपघाताचे देखील प्रमाण वाढलेले आहे. अत्यंत दुय्यम दर्जाची करण्यात आलेली यापूर्वीची डांबरीकरणाची कामे यामुळे उघड झालेली असून डांबर गायब होऊन साठलेल्या खडीमध्ये देखील वाहने घसरून अपघात होत आहेत.


शेअर करा