नगर शहरात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून शक्तीवर्धक गोळ्यांचा पुरवठा करू असे सांगत एका व्यावसायिकाची तब्बल 11 लाख 29 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , रामचंद्र जनार्दन बाबर ( वय 46 राहणार आलमगीर नागरदेवळे राहणार तालुका नगर ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून भिंगार कॅम्प पोलिसांनी राज ठाकूर ( राहणार कामशेत तालुका लोणावळा जिल्हा पुणे ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
फिर्यादी व्यक्ती यांचे आलमगीर इथे एक शॉप असून आरोपी त्यांच्या दुकानात ‘ मी दिलेल्या औषधांची विक्री करा ; असे म्हणत त्याच्याकडील औषधांच्या विक्रीचे मार्केटिंग करण्यासाठी आलेला होता. आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर फोनपे आणि आरटीजीएसच्या माध्यमातून त्यांच्याकडून रक्कम लुबाडली.
फिर्यादी यांनी औषधांचा पुरवठा कधी होणार असे विचारल्यानंतर आरोपीने टाळाटाळ सुरू केली आणि पैसे परत मागितले तर बदनामी करण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी व्यक्ती यांनी पोलिसात धाव घेऊन आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.