नगरमध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून आईच्या मित्रानेच अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार शहरात घडलेला आहे याप्रकरणी बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , वैजनाथ बबन झांजे ( तालुका आष्टी जिल्हा बीड ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून पीडित मुलीची आई घराबाहेर गेल्यानंतर आरोपीने मुलीसोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असे फिर्यादीचे म्हणणे आहे. कुणाला काही सांगितले तर तुला आणि तुझ्या आईला मारून टाकेल अशी देखील धमकी आरोपीने दिली . अल्पवयीन मुलीने त्यानंतर पोलिसात धाव घेतलेली आहे.