..म्हणून त्याचा एन्काऊंटर करण्यात आला , कुणी केले खळबळजनक आरोप ?

शेअर करा

बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने दिलेल्या जबाबात काही महत्त्वाचे खुलासे केले होते म्हणून त्याचा एन्काऊंटर करण्यात आला या प्रकरणात पहिल्या दिवसापासून कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे ,’ असा घणाघाती आरोप शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे. 

संजय राऊत म्हणाले की ,’ एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर केला. एका शिंदेचा एन्काऊंटर झालेला असला तरी दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर जनता करेल. बदलापूर एन्काऊंटर प्रकरण शंका घ्यावे अशी आहे. मोठे मासे वाचवण्यासाठी इन्काऊंटर घडवण्यात आलेले आहे,’ 

संजय राऊत पुढे म्हणाले की ,’ सदर संस्थेचे चालक हे भाजपशी संबंधित आहेत . आरोपीला आमच्याकडे सोपवा आम्ही त्याला फासावर लटकू अशी मागणी होती तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे आम्ही द्रुतगती न्यायालयात खटला चालू असे आश्वासन दिले मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्रात मनोज जरांगे यांनी जे काही वातावरण निर्माण केलेले आहे त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे एन्काऊंटर घडवण्यात आलेले आहे का ? , ‘ अशी शंका संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे. 


शेअर करा