ज्या गुजरात मॉडेलची देशभरात भाजप समर्थक मीडिया चर्चा करतो त्याच गुजरात मधून एक धक्कादायक असे प्रकरण समोर आलेले असून गुजरात मधील दाहोद जिल्ह्यातील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाला विद्यार्थिनीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , गोविंद नट ( वय 55 वर्ष ) असे आरोपी मुख्याध्यापकाचे नाव असून आरोपीने अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेह शाळेच्या आवारात पुरला आणि तिचे दप्तर आणि बूट वर्गाजवळ फेकून दिले. आरोपीने त्यानंतर मुलगी काही कामासाठी बाहेर गेल्याचे देखील नाटक केले होते मात्र पोलिसांनी अखेर आरोपीला ताब्यात घेतलेले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी गोविंद नट याने अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला मात्र तिने आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने तिचा गळा दाबला आणि तिच्या हत्या केली. अल्पवयीन मुलीचे वय अवघे अवघे सहा वर्ष असून तिचा मृतदेह एकोणीस तारखेला शाळेच्या आवारात सापडलेला होता. आरोपी मुख्याध्यापकाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण अर्थात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.