नगरकरांनी महापालिकेच्या चॅनलला फॉलो करून नेमके काय साध्य करायचे ? 

शेअर करा

अहमदनगर महापालिकेच्या वतीने व्हाट्सअप चॅनल सुरू करण्यात आलेला आहे. वास्तविक व्हाट्सअप चॅनल हा एकतर्फी संवाद असतो मात्र व्हाट्सअप चॅनल सुरू करून महापालिका नगरकरांशी कसा संवाद करणार हे यातून स्पष्ट होत नाही. 

अहमदनगर महापालिकेचा व्हाट्सअप चॅनेल मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेला असून महापालिकेच्या आयुक्तांच्या हस्ते याचे उद्घाटन देखील करण्यात आले. नेहमीप्रमाणे या उद्घाटनाची सध्या जोरदार चर्चा असली तरी एकतर्फी संवाद साधून नगरकरांच्या समस्या मनपा प्रशासन कशा सोडवणार ? हा देखील एक प्रश्न आहे. 

केवळ सर्व सिस्टीम ऑनलाइन आणून जर नागरिकांच्या तक्रारींची दखलच घेतली जात नसेल तर केवळ ऑनलाइनचा सोस हा प्रसिद्धीसाठी तर नाही ना असा प्रश्न यामुळे पडल्याशिवाय राहत नाही. नगरकरांनी महापालिकेच्या चॅनलला फॉलो करून नेमके काय साध्य करायचे की महापालिकेचे प्रेस रिलीज आणि इशारे वाचत बसायचे असा प्रश्न नगरकर उपस्थित करत आहेत. 

व्हाट्सअप चॅनेल हा एकतर्फी संवाद असतो आणि ज्या पद्धतीने ग्रुपमध्ये एकमेकांशी संपर्क केला जातो तशी सुविधा व्हाट्सअप चॅनलला नसते सोबतच व्हाट्सअप चॅनेलचा नंबर देखील हाईड केलेला असतो त्यामुळे व्हाट्सअप चॅनलच्या माध्यमातून नगरकरांना नक्की काय सुविधा मिळणार आणि महापालिका अन नागरिक यांच्यातील अंतर नेमके कसे कमी होणार असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. 


शेअर करा