सातत्याने वादग्रस्त विधाने करणाऱ्या भाजपच्या खासदार कंगना राणावत यांनी केंद्र सरकारने मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा लागू करण्याची गरज आहे असे वक्तव्य केल्यानंतर भाजपची चांगलीच अडचण झालेली असून पक्षश्रेष्ठींनी मात्र आम्ही त्या मताशी सहमत नाही असे सांगितलेले आहे. सातत्याने कंगना राणावत यांच्याविषयी प्रश्न विचारल्याने उत्तर देताना भाजप नेत्यांची दमछाक होत आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कंगना राणावत यांच्या वक्तव्यावरून भाजपचा खरा चेहरा उघड झालेला आहे असा आरोप करत शेतकरी आंदोलनातील हुतात्मे आणि मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या केलेला अपमानाबद्दल भाजपला अजिबातही वाईट वाटलेले नाही त्यामुळेच भाजपच्या खासदारांकडून तिन्ही काळे कृषी कायदे लागू करण्याच्या गोष्टी बोलल्या जात आहेत, असे म्हटलेले आहे.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की ,’ शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणाऱ्या रस्त्यांमध्ये काटेरी तारा लावणाऱ्या आणि खिळे ठोकणाऱ्या मोदी सरकारला हरियाणातील शेतकरी कधीही विसरणार नाही. शेतकऱ्यांना आंदोलनजीवी आणि परजीवी म्हणणाऱ्यांना मतदान चांगलेच उत्तर देतील,’ असे देखील त्यांनी यावेळी म्हटलेले आहे.