धनगर बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी दोन आंदोलकांनी 26 सप्टेंबर रोजी प्रवरासंगम येथील गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात होता . प्रशासनाकडून काल रात्रभर त्यांचा शोध सुरू होता मात्र अखेर आज सकाळी हे दोघेही जण पुलापासून दोन किलोमीटर अंतरावर निवांत झोपलेल्या अवस्थेत सुदैवाने आढळून आलेले आहेत.
धनगर बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून मागणी जोर पकडू लागलेली असून 26 सप्टेंबर रोजी प्रवरासंगम येथील गोदावरी नदीत त्यांनी जलसमाधी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात होता. ते मिळून आल्यानंतर शासकीय वाहनाने त्यांना नेवासा फाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी याप्रकरणी माध्यमांना माहिती दिली.
धनगर बांधवांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मागील नऊ दिवसांपासून नेवासा फाटा इथे आंदोलन सुरू असून सहा जण उपोषणासाठी बसलेले आहेत. त्यातील दोन जण प्रात:विधीला जाऊन येतो असे सांगून निघून गेले मात्र त्यानंतर ते परत आले नाहीत त्यामुळे त्यांनी जलसमाधी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात होता.
छत्रपती संभाजीनगर आणि नगर रोडवरील अशा स्वरूपाची एक चिठ्ठी देखील एका कारवर ठेवण्यात आलेली होती आणि बाजूला त्यांचा मोबाईल आणि चपला देखील ठेवलेल्या होत्या त्यामुळे संशय वाढला आणि प्रशासनाकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला. शुक्रवारी सकाळी दोघेही नदीपात्र परिसरात आढळून आलेले आहेत मात्र तरी देखील त्यांनी केलेला हा प्रकार त्यांना अंगलट येण्याची शक्यता आहे.