नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असे प्रकरण 2015 मध्ये समोर आलेले होते.अवघ्या नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार प्रकरणात जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाला वीस वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठेवण्यात आलेली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी याप्रकरणी निर्णय दिलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , पीडित मुलगी ही एका जिल्हा परिषद शाळेत शिकत असून आरोपी राजेंद्र साळवे हा पीडित मुलीला वर्गशिक्षक होता. तीस नोव्हेंबर 2015 रोजी आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. मुलीने घरी हा प्रकार सांगितला सोबतच आरोपीने असाच प्रकार आपल्यावर यापूर्वी देखील केलेला आहे असेही सांगितले त्यानंतर श्रीगोंदे पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायालयात आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.सरकारी पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे यांनी याप्रकरणी कामकाज पाहिले. सरकारी वकील यांनी केलेला युक्तिवाद आणि सबळ साक्षी पुरावे यांच्याआधारे आरोपीला ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.