बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित एन्काऊंटर बद्दल राज्यात आरोप प्रत्यारोप सध्या सुरू असून दुसरीकडे अंत्यसंस्कारासाठी जागा दिली जात नाही तसेच आपल्या कुटुंबाच्या जीविताला देखील धोका आहे म्हणून सरकारने आपल्याला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी आरोपीच्या कुटुंबीयांनी केलेली आहे.
सदर प्रकरणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात गुरुवारी या संदर्भात अर्ज दाखल करण्यात आलेला असून अक्षय याचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांवर देखील हल्ला करण्यात आलेला होता त्यानंतर त्याचा मृतदेह दफन करण्यास देखील बदलापूर परिसरात विरोध होत असून कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याकारणाने आपल्याला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी अक्षय शिंदे यांच्या कुटुंबीयांनी केलेले आहे.