विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणातील हिसार येथे बोलताना अग्निवीरांना निवृत्तीवेतन आणि हुतात्मांचा दर्जा दिला जाणार नाही. केवळ योजनेपुरते अग्नीवीर नाव आहे पण त्याचा खरा अर्थ जवानांची निवृत्ती वेतन आणि त्यांचा हुतात्माचा दर्जा काढून घेणे ,’ असा आहे. भाजप शेतकऱ्यांचा देखील हक्क हिरावून इच्छित असून मोदी सरकारने रोजगार देखील संपवलेला आहे अशी खरमरीत टीका केलेली आहे.
राहुल गांधी म्हणाले की ,’ मी काही दिवसांपूर्वी अमेरिकेला गेलो होतो. हरियाणाचे हजारो लोक अमेरिकेत आहेत. तिथे एका खोलीत 15 ते 20 जण राहतात. तुम्ही अमेरिकेला कसे आहात याबद्दल विचारणा केली तर त्यांनी माझ्या हाती यादी सोपवली. कोणकोणत्या देशांचा प्रवास करत अखेर कसे इथपर्यंत पोहोचले याची माहिती त्यांनी या यादीत दिलेली होती. प्रवासाच्या दरम्यान त्यांना अनेक धोके पत्करावे लागले आणि अनेक ठिकाणी तर त्यांना लुटण्यात देखील आले,’
राहुल गांधी पुढे म्हणाले की ,’ अनेक सहकार्यांना त्यांनी डोळ्यादेखत मरताना देखील पाहिलेले आहे. एका व्यक्तीला प्रवासासाठी तब्बल 35 लाख रुपये खर्च आला. अमेरिकेला जाण्यासाठी काहींनी शेती विकली तर काहींनी व्याजावर पैसे घेतले मात्र एवढ्या पैशात हरियाणात व्यवसाय का केला नाही ? असे विचारले तर त्यांनी आम्ही हरियाणात 50 लाखांचा उद्योग केला तरी तो डब्यात गेला असता असे देखील असे ते म्हणाले. आमच्यासारख्या लोकांसाठी देशात काहीच शिल्लक राहिलेले नाही असे म्हणत आपली खंत त्यांनी व्यक्त केली ,’ असे देखील राहुल गांधी यांनी म्हटलेले आहे.