एका विद्यार्थ्याचा मृतदेह पारनेर तालुक्यातील निघोज येथील पाण्याच्या कुंडात सापडल्याप्रकरणी 

शेअर करा

नगरमधील फकीरवाडा येथील संबोधी वसतीगृहात असलेल्या एका विद्यार्थ्याचा मृतदेह पारनेर तालुक्यातील निघोज येथील पाण्याच्या कुंडात सापडल्याप्रकरणी चौकशी करावी अशी मागणी माणुसकी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक लांडगे यांनी केलेली आहे. 

दीपक लांडगे यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांच्याकडे एक निवेदन दिलेले असून त्यामध्ये,’ मयत विद्यार्थी प्रकाश राजेंद्र निंबाळकर ( राहणार गेवराई जिल्हा बीड ) हा फकीरवाडा येथील संबोधी विद्यार्थी वसतीगृहात राहत होता. अकरावीमध्ये तो शिकत होता आणि 20 सप्टेंबर रोजी त्याचा मृतदेह निघोजला पाण्याच्या कुंडात आढळून आला. संस्थेची मान्यता पाचवी ते दहावीपर्यंत होती मात्र तरी देखील अकरावीच्या विद्यार्थ्याला वस्तीगृहात प्रवेश कसा दिला गेला ?, ‘ असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. 

दीपक लांडगे यांनी निवेदनात पुढे म्हटल्याप्रमाणे ,’ जर अकरावी बारावीचीच मान्यता होती तर विद्यार्थी वसतीगृहात कसा आणि निघोज येथील पाण्याच्या कुंडापर्यंत कसा पोहोचला ? . सदर प्रकरण संशयास्पद वाटत असून सखोल चौकशी करावी. दोषी वसतिगृहाचे संस्थाचालक आणि रजिस्टर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल ,’ असे म्हटले आहे. 


शेअर करा