नगरमध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून दुचाकीवर चाललेल्या एका सराफ व्यावसायिकाला अडवत शस्त्राचा धाक दाखवत कोंबडीवाला मळा परिसरात लुटण्यात आलेले आहे.
नगर सोलापूर रोडवरील कोंबडीवाला मळा इथे 26 तारखेला संध्याकाळी तक्रारदार सराफ व्यावसायिक अंबादास रघुनाथ फुंदे ( वय 42 राहणार नारायणगाव तालुका नगर ) हे त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोकड घेऊन चाललेले होते त्यावेळी तीन अज्ञात चोरटे आले आणि त्यांनी फुंदे यांना शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडील रोकड बॅग घेऊन पलायन केले.
तक्रारदार अंबादास फुंदे यांनी त्यानंतर भिंगार कॅम्प पोलिसात याप्रकरणी तक्रार दिलेली असून त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे.