तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा देखील प्रश्न यामुळे निर्माण होईल , राज ठाकरे म्हणाले की. 

शेअर करा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची तिजोरी येत्या जानेवारीपर्यंत रिकामी होणार असून त्याचा परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणार आहे असा इशारा दिलेला असून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा देखील प्रश्न यामुळे निर्माण होईल असे म्हटलेले आहे. 

राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून अमरावतीत बोलताना ते म्हणाले की ,’ फुकट कोणी मागायला स्वतःहून येत नाही. शेतकऱ्यांनी कधीच मोफत वीज द्या अशी मागणी करत मोर्चा काढलेला नाही . सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हे आमिष दाखवलेले आहे. 

लाडकी बहीण योजनेवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की ,’ अशा फुकट योजना देण्यापेक्षा महिला सक्षम करण्यासाठी रोजगार उपलब्ध करणे आणि त्यांना उद्योग धंद्यासाठी भांडवल आणि प्रशिक्षण देणे हे जास्त गरजेचे आहे मात्र अशा लाडकी बहीणसारख्या योजना आणून सरकार राज्याची तिजोरी खाली करत आहे अशाने राज्य कर्जाच्या खाईत जाईल ,’  असेही ते पुढे म्हणाले. 


शेअर करा