नगर शहरात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना सावेडी उपनगरात प्रेमदान चौकात घडलेली असून एका साठ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केलेला आहे. प्रेमदान चौकाजवळील स्टेट बँक कॉलनी ही घटना 27 तारखेला संध्याकाळी घडलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , नरेंद्र उत्तमराव जोशी ( वय साठ वर्ष ) असे मयत व्यक्तीचे नाव असून घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना साई एशियन हॉस्पिटलमध्ये रात्री आठच्या सुमारास दाखल केले होते मात्र त्यांचा मृत्यू झालेला आहे. तोफखाना पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.