बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे कथित एन्काऊंटर झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीसाठी देखील जागा उपलब्ध होत नव्हती मात्र अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत प्रचंड पोलीस बंदोबस्तात त्याच्या पार्थिवाचा दफनविधी करण्यात आला आहे.
पोलिसांशी झालेल्या चकमकीत अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर राज्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या तर दुसरीकडे अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांवर देखील हल्ला झालेला होता. त्याच्या अंत्यविधीला देखील जागा उपलब्ध करून दिली जात नव्हती म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
उच्च न्यायालयात प्रकरण पोहोचल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले आणि शांतीनगर स्मशानभूमीत अखेर अक्षय शिंदे याच्यावर कुटुंबीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने यावेळी मोठ्या प्रमाणात विरोध केला मात्र पोलिसांनी अखेर कुटुंबियांच्या उपस्थितीत हे अंत्यसंस्कार पार पाडले.