.. तर तुमच्यावर चिलमीत चहा पिण्याची वेळ येईल , मनोज जरांगेचा शाह फडणवीस यांना इशारा

शेअर करा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलेले असले तरी मराठा आरक्षणासाठी आपला लढा संपलेला नाही असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ,’ मराठ्यांच्या नादाला लागू नये .मराठे तुमचा राजकीय एन्काऊंटर करतील,’  असा इशारा दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की ,’ मराठा आणि कुणबी एकच आहेत असा कायदा काढला आणि मराठ्यांना आरक्षण दिले तर सत्तेपासून तुम्हाला कुणी हटवू शकत नाही मात्र तुम्ही व्यवस्थितपणे हा विषय हाताळला नाही आणि मराठ्यांना आरक्षण दिले नाही तर चिलमीत चहा पिण्याची वेळ येईल ,’ असे म्हटलेले आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ,’ आंदोलने होतच असतात. ती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हाताळतील ,’ असे म्हटलेले होते. मनोज जरांगे पाटील म्हणाले की ,’ शहा आणि फडणवीस यांची आंदोलन हाताळण्याची पद्धत आपल्याला चांगली माहिती आहे मात्र मराठ्यांना आरक्षणापासून बाजूला ठेवले तर अमित शहा यांची ती घोडचूक होईल. तुम्ही कोणतीही यंत्रणा आणली तरी संविधानाच्या कोणत्याच पदावर तुम्ही बसू शकणार नाहीत. अमित शहा यांची आंदोलन हाताळण्याची पद्धत घातक असून राजकारणात वरती येण्यासाठी अनेकदा खालच्या स्तराला ते गेलेले आहेत. जनतेने तुमचे राजकीय एन्काऊंटर केले तर तुम्ही दिसणार नाहीत ,’ असेही ते पुढे म्हणाले. 


शेअर करा