सोशल मीडियावर पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी नेवासे पोलीस ठाण्यात एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , माऊली तोडमल ( राहणार नेवासे बुद्रुक तालुका नेवासा ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी पोलिसांची बदनामी होईल अशी सोशल मीडिया पोस्ट केलेली होती त्यामुळे पोलिसांचा मानसन्मान दुखावला असा आरोप ठेवत पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे .