नगरमधील खड्ड्यांनी वाहतुकीचा वेग मंदावला , संपूर्ण शहरात वाहतुकीची कोंडी

शेअर करा

नगर शहरात सुरू असलेल्या विकास कामांची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू असली तरी गर्दीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी देखील प्रचंड दिरंगाई शहरात दिसून येत आहे. शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर झालेले खड्डे यामुळे वाहनांचा वेग मंदावत असून त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी संपूर्ण शहरात पाहायला मिळत आहे. 

नगर शहराला उपनगरासोबत जोडणारे सर्जेपुरा , तारकपूर रोड , कल्याण रोड, भिंगार तसेच इतरही हायवेवरील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झालेली आहे. विकास कामांच्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या जाहिराती नागरिकांच्या माथी मारल्या जात असल्या तरी शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा याकडे संपूर्ण प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. 

एकीकडे रस्ते खड्डेमय झालेले असताना दुसरीकडे महापालिकेने बसवलेले एलईडी दिवे देखील रात्रीच्या सुमारास बंद आढळून येत आहेत. संपूर्ण शहर आणि उपनगरात अशीच परिस्थिती असून केवळ उड्डाण पुलावरील दिवे रात्री सुरू असल्याचे दिसत आहे. शहरासह उपनगरात मोठ्या प्रमाणात अंधार पाहायला मिळत असून त्यामुळे चोऱ्यांचे देखील प्रमाण शहरात वाढलेले आहे. 


शेअर करा