नगर शहरात भर दिवसा घरफोडी , तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल

शेअर करा

नगर शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून बोरुडे मळा येथील अजिंक्य नगर मध्ये एका व्यक्तीचे घर फोडून चोरट्यांनी 50 हजार रुपयांची रोकड चोरून नेलेली आहे. भरदिवसा सोमवारी सकाळी साडेदहा ते अडीच या वेळेत ही घटना घडलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , प्रशांत पंडित ताठे ( वय 41 वर्ष ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून सोमवारी सकाळी ते कुटुंबासह त्यांच्या चुलत भावाच्या घरी गेलेले होते. दुपारी कार्यक्रम संपल्यानंतर ते कुटुंबासोबत घरी आले त्यावेळी घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. किचनच्या खिडकीची काच काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि त्यानंतर पन्नास हजार रुपयांची रोकड चोरून नेली. तोफखाना पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत . 


शेअर करा