देशात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून ऑनलाईन ऑर्डर केलेला आयफोन देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्थेचा डांगोरा पिटणाऱ्या उत्तर प्रदेशातील ही घटना आहे.
उपलब्ध माहितीनुसार , भरत साहू असे हत्या झालेल्या डिलिव्हरी बॉय चे नाव असून सदर प्रकरणी आरोपी असलेला गजानन याने फ्लिपकार्टवरून दीड लाख रुपयांच्या आयफोनची खरेदी केलेली होती आणि कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडला मात्र प्रत्यक्षात जेव्हा मोबाईल आला त्यावेळी आरोपींनी डिलिव्हरी बॉयची हत्या केली आणि मोबाईल घेऊन पसार झाले.
गजानन असे मुख्य आरोपीचे नाव असून मित्रांसोबत भरत साहू यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी त्यांचा मृतदेह लखनऊ येथील इंदिरा कालव्यात फेकून दिला. राज्य आपत्ती प्रतिसाद दल भरत यांचा शोध घेत असून अद्यापपर्यंत त्यांचा मृतदेह आढळून आलेला नाही.