अभिनेता गोविंदा यांना लागली गोळी , रुग्णालयात उपचार सुरु

शेअर करा

बॉलीवूडमधून एक खळबळ उडून देणारी बातमी समोर आलेली असून चित्रपट अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा हे मंगळवारी पहाटे स्वतःच्या घरी जुहू इथे असताना कपाटात रिव्हॉलर ठेवताना गोळी सुटून जखमी झालेले आहेत. क्रिटीकेअर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेले आहे. 

गोविंदा यांच्याकडे रिव्हॉलर बाळविण्याचा परवाना असून मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास प्रवासाची तयारी करत असताना ते त्यांच्याजवळील रिव्हॉलर कपाटात ठेवत होते मात्र याच दरम्यान ट्रिगर दाबले गेले आणि त्यातून गोळी सुटली आणि ती गोविंदा यांच्या पायात शिरली. गोविंदा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

सद्य परिस्थितीत गोविंदा हे शिवसेनेच्या शिंदे गटात कार्यरत असून काँग्रेसच्या तिकिटावर 2004 मध्ये उत्तर मुंबईतून ते खासदार म्हणून निवडून गेले होते. शिंदे गटात गोविंदा दाखल झालेले असले तरी देखील राजकारणात फारसे सक्रिय दिसून येत नाहीत.  काँग्रेसमध्ये  असताना देखील गोविंदा राजकारणात फारसे सक्रिय दिसून येत नव्हते. 


शेअर करा