बदलापूरच्या ‘ त्या ‘ शाळेतील ट्रस्टींना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार कारण.. 

शेअर करा

बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर शाळेने या प्रकरणात दुर्लक्ष केले म्हणून शाळेच्या ट्रस्टींवर देखील पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आरोपी ट्रस्टींना याप्रकरणी दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे. 

उच्च न्यायालयाने या प्रकरणी निर्णय देताना ,’ पीडित मुलगी ही अल्पवयीन असून किशोर वयापर्यंत तिच्या मनावर परिणाम होऊ शकतो तसेच अर्जदार असलेले साक्षी हे पुराव्यांशी देखील छेडछाड करू शकतात ते पाहता अर्जदाराला दिलासा देता येणार नाही ,’ असे म्हटलेले आहे. 

सदर शाळा ही भाजपशी संबंधित असल्याकारणाने अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर करण्यात आले आणि खऱ्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोप विरोधी पक्षाकडून यापूर्वीच करण्यात आलेला आहे. 

पोलिसांना माहिती दिली नाही आणि दुर्लक्ष केले म्हणून शाळेचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या विरोधात देखील पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एक तारखेला उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होते त्यावेळी न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. 


शेअर करा