उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका स्थानिक न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवताना ‘ लव्ह जिहाद पाठीमागे लोकसंख्या वाढीचे डावपेच आणि आंतरराष्ट्रीय कार्यस्थान आहे . विशिष्ट धर्माच्या काही असामाजिक तत्त्वांना आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे ,’ असे निरीक्षण नोंदवलेले आहे.
द्रुतगती न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी हे देखील नमूद केले की ,’ अवैध धर्मांतरासाठी हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते . भारतात देखील अशा असामाजिक तत्त्वांना पाकिस्तान आणि बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण करायची आहे. बेकायदेशीर धर्मांतरामुळे देशाची एकता अखंडता आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण झालेला आहे. मानसिक दबाव , लग्न आणि नोकऱ्यांचे प्रलोभन दाखवत धर्मांतर केले जात असून त्यासाठी परदेशी निधी देखील वापरला जात असल्याचा संशय आहे. सदर बाबीकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. उत्तर प्रदेश सरकारने 2021 पासून बेकायदेशीर धर्मांतर कायदा लागू केलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धर्माचे पालन आणि प्रचार करण्याचा मूलभूत अधिकार आहे मात्र लव्ह जिहादच्या माध्यमातून बेकायदेशीर धर्मांतराद्वारे या वैयक्तिक स्वातंत्र्याशी तडजोड होऊ शकत नाही ,’ असेही न्यायालयाने पुढे म्हटले आहे
हिंदू नाव धारण करून एका आरोपीने हिंदू समाजातील एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलेले होते. गर्भपात प्रकरणी सुनावणी होती त्यावेळी न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलेले आहे..मोहम्मद अलीम असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. हिंदू नाव घेऊन ओळख दडवत त्याने एका विद्यार्थिनीसोबत मैत्री केली आणि त्यानंतर धमकी देत बलात्कार देखील केला. आरोपीच्या वडिलांना देखील दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.