महात्मा गांधींच्या राज्यात शांततामय मार्गाने आपण आंदोलन देखील करू शकत नाही का ? 

शेअर करा

केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाख ला विशेष राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिल्लीत जंतर-मंतरला उपोषणाला परवानगी मागितलेली होती मात्र त्यांना दिल्ली पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आलेली आहे.दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारित येतात त्यामुळे ही परवानगी नाकारल्याची टीका केली जात आहे. 

सोनम वांगचुक यांनी ,’ राजघाटावरील उपोषण सोडतेवेळी केंद्रातील प्रमुख नेत्यांची भेट घालून देऊ असे आपल्याला आश्वासन दिलेले होते मात्र कुणाचीही भेट घालून देण्यात आली नाही ही एक प्रकारची फसवणूक आहे ,’ असे म्हटलेले आहे सोबतच महात्मा गांधींच्या राज्यात शांततामय मार्गाने आपण आंदोलन देखील करू शकत नाही का ? असा खडा सवाल त्यांनी विचारलेला आहे.


शेअर करा