अखेर सस्पेंस संपला…बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांच्याबद्दल ‘ महत्वाची ‘ बातमी

शेअर करा

पुण्यातील प्रसिद्ध पाषाणकर उद्योगसमूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर २१ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाले होते . ते बेपत्ता झाल्यानंतर पूर्ण पुणे शहरात यामुळे एकच खळबळ उडाली होती मात्र आज गौतम पाषाणकर हे सापडले असून ते जयपूर इथे एका हॉटेलमध्ये थांबले होते. कोरोनाचे संकट असताना व कोणताही गुन्हा नसताना गौतम पाषाणकर यांच्या निघून जाण्याने पोलीस पथक गेले अनेक दिवस त्यांच्या शोधामध्ये गुंतून पडले होते. उद्या सायंकाळपर्यंत पोलीस त्यांना घेऊन पुण्यात घेऊन येतील असे सांगण्यात आलेले आहे .

ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध लावण्यात पुणे पोलिसांना तब्बल ३३ दिवसांनंतर यश आले आहे. जयपूरमधील एका हॉटेलमध्ये ते पुणे पोलिसांच्या पथकाला सापडले आहेत. गौतम पाषाणकर हे गेल्या २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी गणेशखिंड रोडवरील आपल्या घरासमोरुन चालकाला घरी जातो, असे सांगून निघून गेले होते. त्यांनी आपण व्यवसायात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी चालकाजवळ दिली होती. पोलिसांनी हरविल्याची तक्रार दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला होता.

गौतम पाषाणकर हे २१ ऑक्टोबर रोजी घरासमोरुन बाहेर पडल्यावर ते थेट स्वारगेटला आले होते. तेथून त्यांनी भाड्याची एक कार ठरविली व ते कोल्हापूरला गेले होते. हे समजल्यावर पुणे पोलीस कोल्हापूरला पोहचले होते. तेथील तारा राणी चौकात ते कारमधून उतरल्याचे व एका हॉटेलमधून पार्सल घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. त्यानंतर ते कोकणात गेल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर त्यांचा शोध लागला नव्हता. जवळपास ३३ दिवसांनंतर पोलिसांना पाषाणकरांचा शोध लागला आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरू केला असता तपासादरम्यान गौतम पाषाणकर यांची आत्महत्यासंदर्भात एक चिठ्ठी लिफाफ्यात सापडली होती, यामध्ये व्यवसायातील आर्थिक नुकसान यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी म्हटले होते मात्र ते सुखरुपरित्या सापडल्याने कुटुंबीय सुखावले आहेत.

काय आहे प्रकरण ?

पुण्यातील वाहन उद्योग क्षेत्रातील पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम पाषाणकर हे बुधवारी (दि. २१) सायंकाळपासून बेपत्ता झाले होते . गौतम पाषाणकर हे पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आहेत तसेच बांधकाम व्यावसायिक देखील आहेत. ते बुधवारी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडले आणि लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिस मध्ये गेले तेथून शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर एक बंद लिफाफा त्यांनी चालकाकडे दिला आणि तो घरी देण्यास सांगितले. चालक लिफाफा देण्यासाठी घरी गेला त्यानंतर पाषाणकर ऑफिसमधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले. ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलिसात धाव घेतली आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदविण्यात आली.

तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात आत्महत्या संदर्भातली चिठ्ठी आढळली. काही दिवसापासून व्यवसायात झालेल्या नुकसान यामुळे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत असून याकरिता कोणालाही जबाबदार ठरू नये असे लिहिलेले आहे. आत्महत्या करण्याची भीती असल्याने पोलिसांनी देखील तपासाचा वेग वाढवला होता . विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला गेला होता तर पुत्र कपिल पाषाणकर यांनी राजकीय अँगल देखील असल्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे ह्या प्रकरणात गूढ वाढले होते.


शेअर करा