
पाकिस्तान मधील अल्पसंख्यांक समुदाय असलेले हिंदू बांधव हे प्रचंड अडचणींचा सामना करत पाकिस्तानमध्ये राहत आहेत. अल्पवयीन मुलींचे अपहरण , व्यावसायिकांना दमदाटी ,धर्मांतर अशा घटना नेहमीच्या झालेल्या असून पाकिस्तानातील पंजाब प्रांतात रहीम यार खान या भागातून दोन हिंदू व्यापाऱ्यांचे अपहरण करण्यात आलेले आहे.
उपलब्ध माहितीनुसार , शमीर जी आणि धीमा जी अशी अपहरण करण्यात आलेल्या दोन्ही व्यापाऱ्यांची नावे असून काबुल सुखाना नावाच्या एका गुंडाने त्यांचे अपहरण केलेले आहे. काबुल याच्यावर तब्बल एक कोटी रुपयांचे बक्षीस पाकिस्तान सरकारने जाहीर केलेले असून यापूर्वी देखील आणखीन पाच जणांचे अपहरण आरोपीने केलेले आहे.
काबुल सुखाना याच्या काही गुंडांनी एक व्हिडिओ रिलीज केलेला असून ‘ आमच्या सहकाऱ्यांची तातडीने सुटका केली नाही तर अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तींची हत्या करू ‘ अशी देखील धमकी दिलेली आहे. स्थानिक पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत .