अखेर ‘ त्या ‘ दुर्दैवी घटनेत महिलेने गमावले प्राण , झालं असं की.. 

शेअर करा

अहिल्यानगर जिल्ह्यात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना संगमनेर तालुक्यातील देवगाव इथे समोर आलेली असून मका कापण्यासाठी महिला गेलेली असताना तिच्यावर बिबट्याने हल्ला केला त्यात महिलेचा मृत्यू झालेला आहे. शुक्रवारी 11 तारखेला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , योगिता आकाश पानसरे ( वय 37 वर्ष ) असे महिला यांचे नाव असून देवगाव शिवारातील पानोबा वस्ती येथील त्या रहिवासी होत्या. शुक्रवारी संध्याकाळी योगिता घरात शेतात गेलेल्या होत्या त्याच वेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यासोबत लहान मुले देखील होती त्यांनी आरडाओरडा सुरू केला. शेजारी घास कापत असलेल्या काही महिलांनी तिथे धाव घेतली मात्र तोवर बिबट्याने योगिता यांना ओढत झुडपात नेले होते. 

नागरिकांनी मोठमोठ्याने आवाज केल्यानंतर बिबट्या पळून गेला त्यानंतर योगिता यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झालेला होता . संगमनेरसोबतच ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उंच गवत जिथे आढळून येते अशा ठिकाणी बिबट्यांचा वावर पाहायला मिळत असून लपण्यासाठी बिबट्याला या ठिकाणी सुरक्षित जागा मिळते त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे . 


शेअर करा