
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केलेला असून ,’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी शिवसेनेचा भगवा रंग यांनी पार बदलला आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एमआयएम मध्ये काहीच फरक राहिला नाही ,’ असे म्हटलेले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की ,’ पाकिस्तानचे झेंडे तुम्ही तुमच्या मोर्चात नाचवले. बॉम्बस्फोटातील आरोपी असलेला इकबाल मुसा हा देखील तुमच्या प्रचारात आला. याकूब मेमन याच्या मजारीच्या उदात्तीकरणाची आगळीक तुम्ही केली आणि दिल्लीत मला मुख्यमंत्री करा म्हणून फिरत आहे पण त्यांचे मित्र त्यांना हे पद द्यायला तयार नाहीत , तिथे जनता त्यांना निवडून दिल का ? ‘असेही ते पुढे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की ,’ महाविकास आघाडी सरकार जर सत्तेत राहिले असले तर मोरू सकाळी उठला आणि रात्री झोपला एवढेच म्हणावे लागले असते. हिऱ्याच्या पोटी गारगोटी जन्मली. महाराष्ट्रातील मेट्रो , बुलेट ट्रेन , पोस्टल रोड या प्रकल्पांना महाविकास आघाडीने ब्रेक लावला. स्वतः बंगल्यावर बंगले बांधणार मात्र धारावीकरांनी फक्त चिखलातच राहायचे काय ? ‘, असा देखील खडा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे.
एकनाथ शिंदे यांनी पुढे बोलताना ,’ सकाळ संध्याकाळ फेसबुक लाईव्ह करून घरी बसणारा मी मुख्यमंत्री नाही तर जनतेच्या दारात जाणारा मी मुख्यमंत्री आहे. कोविड काळामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात काम झाले नाही अशी कारणे देऊ नयेत. त्या काळातील अपयश झाकण्याचा प्रयत्न जनतेला आता नकोसा झालेला आहे. आपणच खरी शिवसेना आहोत आणि धनुष्यबाणाचे खरे धनी आहोत ,’ असे देखील ते यावेळी म्हणाले.