लिव्ह-इन-रिलेशनशिप राहणारी महिला अचानक गायब , अखेर ‘ धक्कादायक ‘ सत्य आले बाहेर

शेअर करा

ती त्याच्यासोबत कित्येक महिन्यांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती मात्र त्याची नियत बदलली आणि त्याने तिचा अमानुषपणे खून केला. बातमी गुजरात येथील असून गुजरातच्या बारडोली येथे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर तिचा मृतदेह तिच्याच वडिलांच्या शेतात पुरला होता. धक्कादायक बाब म्हणजे पाच महिन्यांची गरोदर होती. या प्रकरणी आरोपी प्रियकराला अटक करण्यात आली आहे

उपलब्ध माहितीनीसार , रश्मी असे मृत महिलेचे नाव आहे. १४ नोव्हेंबर रोजी तिने आपल्या तीन वर्षांच्या मुलाला तिच्या पालकांच्या घरी सोडले आणि ती निघून गेली. तेव्हापासून ती गायब झाली असता पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. अखेर त्यांनी पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रश्मी चिराग नावाच्या तरुणासोबत गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती. पोलिसांनी चिरागची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने रश्मीची हत्या केल्याची कबुली दिली. रश्मीचा गळा आवळून हत्या केली आणि तिचा मृतदेह घरापासून २२ किलोमीटरवर असलेल्या तिच्या वडिलांच्या शेतात जेसीबीच्या साह्याने खड्डा घेऊन पुरला, असे त्याने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी चिरागची चौकशी केली असता, तिच्या हत्येचे कारण त्याने सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे चिराग हा विवाहित होता आणि दोघांमध्ये रश्मीवरून वारंवार भांडणे होत होती. चिरागच्या पहिल्या पत्नीवरही पोलिसांना संशय आहे. रश्मी आणि तिच्यात काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. तिचा मारहाणही केली होती. रश्मीच्या हत्येत चिरागसह इतर साथीदारही असावेत, असा संशय पोलिसांना आहे.


शेअर करा