पत्नीपिडीत पतींना मोफत चहा तर प्रेमभंग चहा ५ रुपयांना.. ‘ कालू बेवफा ‘ चायवाला होतोय वेगाने व्हायरल

शेअर करा

आनंदात असो किंवा दुःखात कोणत्याही स्थितीत चहाप्रेमींना चहा हवाच असतो. घरातून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक कोपऱ्यावर चहाची टपरी किंवा एखादे अमृततुल्य चहाचे दुकान असतेच. आपला चहा खास आणि ग्राहकांच्या मूड प्रमाणे देखील असावा यासाठी चहाविक्रेते नेहमीच प्रयत्न करत असतात. प्रत्येक विक्रेत्याच्या चहाची एक वेगळी खासियत असते.

ग्राहकांच्या मनस्थितीचा विचार करता या चहावाल्याने अनोखी शक्कल लढवली आहे असून सोशल मीडियावर सध्या एक आगळा वेगळा चहावावाला व्हायरल होत आहे. हे चहाचं दुकान ग्वाल्हेरला असल्याचे सांगितले जात आहे. दुकानाचे नाव देखील हटके ‘ कालू बेवफा ‘ असे असून या चहा विक्रेत्याच्या दुकानात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या चहाचा आस्वाद घेता येईल. खासकरून प्रेमभंग झालेल्यांसाठी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या चहा मिळत आहेत. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कालू बेवफा चहावाल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या चहाच्या प्रकाराचा एक तक्ता तयार केला आहे.

चहाच्या प्रकारानुसार किमतीतही बदल दिसून येत आहे. प्रेमात धोका मिळाला असेल तर त्या चहाची किंमत ५ रुपये आहे. तर प्रेमी जोडप्याच्या स्पेशल चहाची किंमत १५ रुपये आहे. नवीनच रिलेशनशिपमध्ये आलेल्या प्रेमींच्या चहाची किंमत १० रुपये आहे. एकटेपणा चहाची किंमत २० रूपये आहे.विशेष म्हणजे या चहाच्या दुकानात ऑफरसुद्धा मिळत आहे. कालू बेवफा चहावाल्याच्या दुकानात पत्नीपिडीत म्हणजेच पत्नीच्या त्रासाने ग्रासलेल्यांना मोफत चहा दिला जाणार आहे. याशिवाय पती पत्नी एकत्र या चहाच्या दुकानात आल्यानंतर या दुकानात डेमोवाली चहा मोफत देण्यात येणार आहे.


शेअर करा