भाजी आणायला गेलेली महिला झाली होती गायब, तब्बल १६ दिवसांनी उलगडले ‘ धक्कादायक ‘ रहस्य

  • by

उत्तर प्रदेशातील मथुरा येथील पोलिसांनी 16 दिवसांपूर्वी झालेल्या महिलेच्या हत्येबाबत मोठा खुलासा झाला आहे. महिलेच्या हत्या प्रकरणात तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू आणि दोरी सापडली आहे. पोलिसांनी सांगितलं की, 1 कोटीची संपत्ती हस्तगत करण्यासाठी पतीने पत्नीची दोरीने गळा आवळून हत्या केल्याची शक्यात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव चरण सिंह आहे. आरोपी पतीने पैशांसाठी आणि अवैध संबंधांसाठी आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचना होता. एसपी सिटी उदय शंकर सिंह म्हणाले की, आरोपी चरण सिंह औरंगाबादमधील शक्ती धाम कॉलनीतील राहणारे आहेत. ते पत्नी मायावतीसोबत राहत होते

मिळालेल्या माहितीनुसार पत्नी मायावती 12 नोव्हेंबर रोजी भाजी घेण्यासाठी बाजारात गेली होती आणि तेथूनच ती अचानक गायब झाली त्यानंतर 18 नोव्हेंबर रोज महिलेचा मृतदेह एटीव्ही नगरासमोरुन सापडलं आहे. मथुरा पोलिसांनी केलेल्या तपासानंतर धक्कादायक बाब समोर आली. महिलेचा पती चरण सिंहने आपल्या पत्नीचा दोरीने गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह फेकून दिला होता.विवाहबाह्य संबंधात अडथळा आणि पैसा या कारणावरून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी पती चरण सिंह याला अटक केली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार चरण सिंह याचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. एसपी सिटी उदय शंकर सिंह म्हणाले की, आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली दोरी आणि चाकूदेखील जप्त करण्यात आला आहे. आरोपीचे एका महिलेसोबत अवैध संबंध होते, आणि आपल्या पत्नीला हटवण्यासाठी त्याने तिची हत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.