अन दगाबाज बॉयफ्रेंडची पहिलीच रात्र एक्स गर्लफ्रेंडने केली ‘ फेविक्विक स्पेशल ‘ : केले असे की ?

  • by

दोघांमध्ये कित्येक महिन्यांपासून प्रेमसंबंध होते मात्र ऐनवेळेस प्रियकराने दगा दिला आणि दुसऱ्याच मुलीशी लग्न केले त्यामुळे संतापलेल्या गर्लफ्रेंडने प्रियकर सोडून चक्क त्याच्या नवीन विवाहितेला पकडले आणि मारहाण केली. बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर प्रेयसीने रागाने त्याच्या पत्नीचे केस कापले आणि तिच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. गावकऱ्यांनी तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही धक्कादायक घटना बिहारमधील नालंदा इथे घडली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर राग अनावर झालेली त्याची गर्लफ्रेंड मंगळवारी रात्री त्याच्या घरात घुसली. तिने घरात झोपलेल्या नव्या नवरीचे केस कापले आणि तिच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. त्याचदरम्यान पीडितीने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून शेजारी धावून आले. त्यांनी आरोपी तरुणीला पकडले आणि बेदम चोप दिला. त्यानंतर तिला पोलिसांच्या हवाली केले. या अचानक झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. नालंदा जिल्ह्यातील भागनबिगहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

नवरदेवाच्या नातेवाईकांनी सांगितले की, रात्री नवरी खोलीत झोपली होती. मध्यरात्री संबंधित तरूणी तिच्या खोलीत शिरली. आरडाओरड ऐकून आम्ही गेलो. नवविवाहितेची अवस्था पाहून आम्हाला धक्का बसला. त्याचवेळी पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला पकडून नातेवाईकांनी चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाणीत ती तरूणी जखमी झाली होती.