तब्बल २२ वर्षांनी कोरड्या विहिरीत मिळालेल्या सापळ्याचे रहस्य उलगडले. ‘ ह्या ‘ कारणावरून झाली होती हत्या

शेअर करा

गुन्हेगार काही काळ कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकतो मात्र कधी ना कधी कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोहचतातच याचाच प्रत्यय यावा अशी एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे . १९९८ साली केलेल्या खुनाच्या आरोपीना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे .

उत्तर प्रदेशातील अलिगडमधील मानपूर गावात २२ वर्षांपूर्वी एका पाच वर्षीय अशोक नामक मुलाची अपहरणानंतर हत्या करण्यात आली होती. मुलाच्या हत्येप्रकरणी त्याच्या काका आणि काकीला अटक करण्यात आली आहे. गळा दाबून पुतण्याची हत्या केल्यानंतर मृतदेह एका विहिरीत फेकून दिला होता. त्या विहिरीत हाडांचा सापळा चुरा झालेल्या अवस्थेत आढळून आला आहे . तब्बल २२ वर्षे हे आरोपी पोलिसांच्या ससेमिऱ्यापासून वाचले होते मात्र अखेर आज त्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे .

मानपूर गावात १९९८ मध्ये ५ वर्षीय अशोकचं अपहरण झालं होतं. त्यानंतर त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली होती मात्र अनेक वर्षे झाली तरी अपहरणकर्ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत मात्र २२ वर्षांनंतर या हत्येच्या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी मुलाच्या काका आणि काकीला अटक केली आहे. त्यांनी हत्येची कबुली दिली असून, त्यांनी दिलेल्या माहितीवरून विहिरीत शोध घेतला असता अस्थी सापडल्या आहेत.

अपहरण आणि हत्येनंतर गेली २२ वर्षे आरोपी आणि त्याचे कुटुंबीय वल्लभगड येथे राहत होते. कोणत्याही नातेवाईकांशी संपर्क न ठेवल्यानं त्यांचा ठावठिकाणा शोधण्यास देखील पोलिसांना अडचणी येत होत्या. मात्र पोलीस निरीक्षक आशीष कुमार सिंह यांनी ‘वॉन्टेड’ असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरुवात केली. आणि मुख्य आरोपी दीपचंद्र, त्याचा मुलगा मलुआ उर्फ तेजवीर आणि त्याची पत्नी हरद्वारी देवी यांना फिल्डिंग लावून अटक केली. त्यांच्याविरोधात १९९८ साली सावत्र भाऊ रवी कुमारचा ५ वर्षीय मुलगा अशोकचं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र ते फरार झाल्याने सापडू शकले नव्हते .त्यांनी सांगितलेल्या कोरड्या विहिरीतील मातीत हाडांचा चुरा सापडला असून फॉरेन्सिक लॅबमध्ये डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे.

अशोकचा खून केल्यानंतर त्यांनी मृतदेह जंगलातील झुडपात असलेल्या एका कोरड्या विहिरीत फेकून दिला होता. त्यानंतर सर्व जण वल्लभगड इथे निघून गेले मात्र नाव व ओळख बदलून राहत असल्याने हळू हळू तपासात देखील शिथिलता येत गेली मात्र अखेर त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले.


शेअर करा