आणि ‘ त्या ‘ दुर्दैवी घटनेत अखेर पाच वर्षीय आर्यनचा मृत्यू , तब्बल 55 तास.. 

शेअर करा

देशात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना राजस्थानमध्ये समोर आलेली असून दौसा जिल्ह्यात सुमारे दीडशे फूट बोअरवेलमध्ये पडलेल्या बालकाची मृत्यूसोबतची झुंज अखेर संपलेली असून त्याचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेला आहे. मयत बालकाचे पाच वर्षे वय होते. बुधवारी रात्री 55 तासाच्या बचाव मोहिमेनंतर त्याला बाहेर काढण्यात आले आणि रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झालेला होता.

राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील कालीखड गावात सोमवारी नऊ तारखेला दुपारी तीनच्या सुमारास खेळत असताना पाच वर्षीय आर्यन बोअरवेलमध्ये पडलेला होता. एनडीआरएफच्या पथकाने त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आणि त्याच्यासाठी ऑक्सिजन पाईपद्वारे पुरवठा देखील सुरू करण्यात आला. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी समांतर खड्डा खोदून प्रयत्नही करण्यात आले आणि अखेर त्याला 55 तासांनी बाहेर काढण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेले आहे. 


शेअर करा