संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करा

शेअर करा

‘ बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील मराठा आंदोलक सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील राजकीय वरदहस्त असणाऱ्या मुख्य सूत्रधाराला तात्काळ अटक करा आणि हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालून आरोपीला फाशीची शिक्षा करा , यासाठी अखंड मराठा समाजातर्फे श्रीरामपूर इथे तहसीलदार मिलिंद वाघ आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांना निवेदन देण्यात आलेले आहे. 

निवेदनात म्हटल्याप्रमाणे ,’ मराठा आंदोलक सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यानंतर त्यांचा खून करण्यात आला. सदर प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींना तातडीने अटक करावी आणि जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी त्यांना राजकीय वरदहस्त देणाऱ्यांना देखील आरोपी करावे. सदर तपास हा सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात यावा ,’ अशी देखील मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. 

मराठा बांधवांनी केलेल्या या मागण्यांचा सरकारने गांभीर्याने विचार करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा देखील इशारा देण्यात आलेला असून घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार शिवराज देशमुख आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना देखील पोलीस संरक्षण देण्यात यावे सोबतच त्यांच्या कुटुंबाचे राज्य सरकारने पुनर्वसन करावे अशी मागणी करण्यात आलेली आहे. 


शेअर करा