नवरा इतका ‘ नीच ‘ असेल याची तिने कल्पनादेखील केली नव्हती : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

नवरा-बायकोचे नाते हे कुटुंबाच्या एकोप्यासाठी मोठे महत्वाचे मानले जाते. लग्नानंतर दोघे जण एकत्र संसार सुरु करतात. या संसारात लहान खटके उडणे ही सामान्य गोष्ट असली तरी काहीवेळा ती भांडणं टोकाला जातात आणि त्यातून पुढे अनेक गुन्हे घडतात .विवाहित महिलेच्या छळासंबंधी अनेक गुन्हे आजवर पोलिसात नोंदवले गेले आहेत मात्र त्याहून देखील धक्कादायक प्रकार गुजरातमधील वडोदरा इथे घडला असून महिलेने तिचा पती असलेल्या प्रकाश याच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, प्रकाश आणि त्याची पत्नी यांचे दोघांचे नोव्हेंबर 2017 साली लग्न झाले. दोघांमध्ये लग्नानंतर लगेच भांडणाला सुरुवात झाली. या भांडणातूनच त्याचा पत्नीने प्रकाशचे घर सोडले आणि ती माहेरी राहू लागली. त्यामुळे संतापलेल्या प्रकाश याने दोघांमधील भांडणानंतर नीचपणाच्या मर्यादा ओलांडत आपल्या बायकोचे फोटो एस्कॉर्ट सर्व्हिस देणाऱ्या साईटवर अपलोड केले. सदर प्रकार लक्षात येताच पत्नीने या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.सदर महिला ही आयटी क्षेत्रात काम करते.

महिलेच्या म्हणण्यानुसार, “ प्रकाशने फेब्रुवारी महिन्यात चार वेगवेगळ्या विवाहविषयक साईटवर सुरुवातीला माझे फोटो अपलोड केले होते. मी माहेरी असताना त्याने हा उद्योग केला मात्र प्रकाशचे एवढ्यावरच समाधान झाले नाही तर त्याने पुढे जाऊन तिचे फोटो एस्कॉर्ट साईटवर अपलोड केले “. हा प्रकार समजल्यानंतर आपल्याला मोठा धक्का बसल्याचं तिनं सांगितलं. प्रकाशने मित्रमंडळींमध्ये देखील आपल्याबदद्दल गैरसमज पसरवल्याचा आरोप पत्नीने केला आहे.वडोदाराच्या मकारपूरा पोलिस स्टेशनमध्ये प्रकाश आणि त्याच्या सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फक्त प्रकाशच नाही तर प्रकाशचे आई-वडील आणि लहान भावाने देखील आपला छळ केल्याची तक्रार या महिलेने केली आहे.


शेअर करा